एसपीएम शाळेजवळ स्पीड ब्रेकर लावा – नितिन बिहारी.

0
548

एसपीएम शाळेजवळ स्पीड ब्रेकर लावा – नितिन बिहारी.

सुसाट गाड्यांना आवरण्यासाठी व परिसरातील किरकोळ अपघात रोखण्यासाठी गतिरोधक अत्यावश्यक.

राजु तुरणकर – संपादक.

वणी एस पी एम शाळेजवळ काल दुचाकी व चारचाकी गाडीत धडक लागून अपघात झाला. दरम्यान त्यात एक दुचाकी वर स्वार असलेली वेगाव येथील महीला धडक लागल्याने खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना काल 12 जानेवारीला ला सायंकाळी 5:40 वाजताच्या दरम्यान घडली. परिसरातील जनतेने तिला ऑटो मध्ये बसवून दवाखान्यात उपचार घेण्यासाठी पाठविले. चारचाकी गाडी  घटना स्थळावरून पसार झाली. परीसरात अनियमित वाहतुकीमुळे अपघात वाढत आहे. दरम्यान शहारत अनेक मोठ्या अपघातात मृत्यूचा देखील सामना करावा लागत आहे.

यापूर्वी सुद्धा एस पी एम शाळे जवळ दोन दुचाकीत अपघात होवून दूध विक्रेता अनिल ठेंगणे हा गंभीर जखमी झाला होता. व या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत असल्याचे भाजप व्यापारी आघाडीचे नितिन बिहारी यांनी सांगीतले.

शाळा, कॉलेज सुटल्यावर याठीकणी प्रचंड गर्दी होत असते, त्यामुळे दुर्गामाता मंदीर ते एस पी एम शाळा परिसरातील रोडवर तिन्ही बाजूला ब्रेकर अत्याआवश्यक असुन सदरील रोडवर तातडीने ब्रेकर बसवुन होणारी अनुचित घटना टाळण्याची मागणी परिसरातील नागरिक तसेच नितिन बिहारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here