अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पहापळे.

0
235

अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पहापळे.

कुणबी समाजाचे संघटन कौशल्य व समाज कार्याची पावती याची दखल घेत जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून सन्मानित.

राजु तुरणकर – संपादक.

राजेश पहापळे यांची वणी येथील समाजाचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विदर्भ स्थरावरील वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन, समाजातील युवा वर्गाला जागृत करुण संघटन बांधणी व कुणबी भवनाचे नव्याने योग्य नियोजन केल्याने समाजात त्यांच्या नेतृत्वाप्रती आदर निर्माण झाला. याचं कार्याची दखल घेत त्यांची अखिल कुणबी महासंघाचं काम (कार्य) संघटन संपूर्ण देशात मजबुत करण्याच्या उद्देशाने अखिल कुणबी महासंघ जिल्हाध्यक्ष पदी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी के आरिकर यांनी नियुक्ती केली आहे.

अखिल कुणबी महासंघामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती, कुणबी समाजातील काम, सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन, अखिल कुणबी महासंघाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे.

अखिल कुणबी महासंघ थोर संत, संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी वाटचाल करणारी संघटना आहे. महापुरूषांचा विचार कुणबी समाजात रूजवून सर्व पोटजातींना एका विचारांनी कुणबी समाजाची संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशिल करणारं असल्याचे प्रतिपादन पहापळे यांनी केले.

अखिल कुणबी महासंघामध्ये काम करण्याची आवड असणारे व स्वेच्छेने काम करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून अखिल कुणबी महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून संघटनेने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम करून अखिल कुणबी महासंघाचे संघटन वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा राजेश पहापले यांनी विश्र्वास व्यक्त करुण समाज प्रबोधनाचा जागर व पुरोगामी विचारांचा प्रसार करुण समाजातील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक यांना सोबत घेवुन समाजाच्या समस्या शासन स्तरावर मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश पाहापळे यांनी लोकवाणी जागरसी बोलतांना सांगितले.

या निवडीने समाजातील युवा वर्गात, नेतेमंडळी, महीला मंडळ मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असुन सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here