बंदी असलेल्या जीवघेणा सुगंधित तंबाखू साठा जप्त करण्यात वणी पोलिसांना यश.

0
145

बंदी असलेल्या जीवघेणा सुगंधित तंबाखू साठा जप्त करण्यात वणी पोलिसांना यश.

पोलीस स्टेशन वणीची सुगंधित तबाखूची जप्तीची धडक कारवाई.

राजु तुरणकर – संपादक.

गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधीकारी वणी व गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांनी आपल्या पो स्टॉफ सह सदर घटनास्थळी जाऊन सीमा राम सुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांना माहीती देऊन यांचे फिर्यादवरून अप क्र. 135/2025 कलम 26 (1), 26 (2) (iv), 27(3)(e), 30(2)(a), कलम 3(1)(zz)(iv) , 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, 123 274,275,223 भारतीय न्याय संहीता 2023 अन्वयेगुन्हादाखल असून यातील आरोपीचे ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मजा 108
सुगधित तंबाखु किंमत 106510 /- रूपयाचा माल अवैद्य रित्या मिळुन आला असुन आरोपी रोहित सुभाष तारुणा, वय 28 वर्षे रा. प्रभाग न.3, गुरुनानक नगर, सिंधी कॉलोनी, वणी ता. वणी जि. यवतमाळ यांनी सदरचे प्रतिबंधित अन्नपदार्थ हे खाल्यास ते मानव जीवितास अपायकारक आहे व ते खाल्ल्याने शरीरास इजा होऊ शकते म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचे दृष्टीने साठा, वाहतूक, विक्री, उत्पादन, वितरण साठी प्रतिबंध लावलेला आहे हे, माहिती असताना स्वतःच्या फायद्याकरिता या अन्नपदार्थाची विक्री साठी साठवणूक केल्याने, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील 2011 चे कलम 26(1), 26(2) (lv) 27(3)(e), 30(2)(a) , कलम 3(1)(zz)(iv) शिक्षा पात्र कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, 123 274,275,223 भारतीय न्याय संहीता 2023 नुसार गुन्हा केल्याचे फिर्यादिचे लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली असुन सदर आरोपीस नयालयात हजर करण्यात आले असुन आरोपीचा पीसीआर मागितला असता मा न्यायालयाने एम सी आर दिल्याने आरोपीचे कारागृह यकवतमाळ रवाना करण्यात आले
पुढील तपास पोउपनि सुदाम आसोरे पोलीस स्टेशन वणी करत आहे.


सदर कारवाई  गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधीकारी वणी, गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी,पोउपनी शेखर वांढरे,स फौ 1750 सुरेंद्र टोंगे, पोहेका 2189 मारोती पाटील, पोहेका 716 दीपक मडकाम पो का 411 शाम राठोड पो का 895 विजय गुजर,पो का 2527 महेश बाडलवार पो का 1737 प्रफुल नाईक मपोना 2398 जया रोगे म पो का 2375 चैताली व पो स्टॉप यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here