मनसे पक्षाकडे जनसामान्य जनतेचा वाढता कल. शेलु येथील असंख्य महिला, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत मनसेत दाखल.
राजू तूरणकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता सर्व पक्ष राजकीय गोंधळात पडले आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार्यद्धती व ठाम भूमिकेच्या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात आता जनता मोठ्या विश्वासाने राज ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहताना दिसून येत आहे. वणीचे राजु उंबरकर मनसे नेते यांच्या कार्यप्रणालीमुळे जनमानसात प्रचंड आदर युक्त दबदबा निर्माण झाला आहे.याचे परिणाम आता पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर यांच्या संपर्कातून वणी तालुक्यातील शेलु येथील असंख्य महिला व पुरूषांनी दिनांक 8/11/2023 बुधवारला मनसे मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहोकार, रमाताई तामगाडगे, शहर अध्यक्ष वैशाली तायडे साधना आवारी, वनीता आवारी उषा कोंडेकरसह गावातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होते.