“नारी तू नारायणी – स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा”
मनसे पक्ष्याचा वर्धापन दिनानिमित्त नारी कर्तृत्वाचा सन्मान.
राजू तुरणकर – संपादक.
मनसेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 मार्च 2026, सोमवार रोजी वणी येथे पक्षनेते राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात व मनसे जिल्हाध्यक्ष अर्चनाताई बोदाडकर यांच्या पुढाकाराने तिन्ही तालुक्यातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धा व स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता.
मराठी संस्कृतीचा अभिमान जपत महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मोठे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

घराचे घरपण जपणारी, घरातील मांगल्य आणि परंपरा जपत कुटुंब सांभाळणारी आणि तरीही समाजकार्यात पुढे येणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने शक्तीचे प्रतीक आहे.
कोरोना काळात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजसेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या अशा सखींच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे संपूर्ण आयोजन मनसे जिल्हाध्यक्ष अर्चनाताई बोदाडकर आणि त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजनातून केले.
अर्चनाताई यांच्या जिद्द, चिकाटी आणि महिलांना संघटित करण्याच्या नेतृत्वगुणांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
सन 2009 पासून विविध सामाजिक व संघटनात्मक पदांवर कार्य करत त्यांनी समाजकार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेत असतात.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगर परिषद सदस्य अल्काताई त्र्यंबके, तर उद्घाटिका माजी नगराध्यक्ष प्रियाताई लभाने होत्या. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पेचे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे , वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेशे ढोके यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
वैशाली तायडे, शितल पिंपळळर,ज्योती मेश्राम, मेघाताई तांबेकर व पुज्या ताई यांच्या सहकार्यातून व अर्चनाताई यांच्या उत्कृष्ट नियोजनमुळे हा समाजाभिमुख कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.











