कालबाह्य औषधे निष्काळजीपणे जंगलात फेकल्याने वितरकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द.

0
1166

कालबाह्य औषधे  जंगलात फेकून दिल्याने वितरकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द,

औषधे विक्री व्यवसायिकांमध्ये उडाली खळबळ.

आनंद नक्षणे—मारेगाव.

जुलै महिन्यात तहसीलच्या जळका जंगल व्याप्त भागातील पांढरदेवी मंदिर परिसराच्या जंगलात कालबाह्य झालेली औषधे संशयास्पदरित्या फेकण्यात आल्याने खळबळ माजली होती.याची गंभीर दखल घेत प्रशासनाने सखोल चौकशी अंती निष्काळजीपणाचा गंभीर ठपका ठेवत परवाना रद्द करण्यात आला.

वणी टागोर चौक येथील श्रेयश डीस्ट्रीब्युटर्स वितरकाचा परवाना कायम स्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

सदर कालबाह्य औषधी प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.पोलिसांनीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

अन्न व औषध विभागाला औषधांच्या पेट्यांवर बॅच क्रमांक मिळताच त्यांनी वणी उपविभागातील सर्व औषध दुकानांची झाडाझडती घेतली. त्यात वणी टागोर चौकातील श्रेयश औषधी वितरकाचे बॅच क्रमांक संगणकीय नोदी जुळल्या. चौकशी अगदी बारकाईने करण्यात आली.त्यात श्रेयश वितरक दोषी आढळून आला. 10 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार श्रेयश डीस्ट्रीबुटर्स परवाना कायम स्वरुपात रद्द करण्यात आला.या कारवाईने वणी मारेगाव झरी पांढरकवडा येथील औषध चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

यू.एस. अन्न व औषध प्रशासना(U.S. Food and Drug Administration) चे म्हणणे आहे की कालबाह्य औषधे कधीही खाऊ नयेत. बर्‍याच अज्ञात बदलांमुळे हे खूप धोकादायक असू शकते, त्यामुळे निष्काळजीपणे या औषधाची योग्य ती विल्हेवाट न लावता जंगलात फेकून दिल्याने ही कार्यवाही करण्यात आली.

वणी होलसेल विक्रेता श्रेयश डीस्ट्रीबुटर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे .कोणत्याही परवाना रद्द करण्याच्या कारवाईत 90 दिवसांनंतर रद्द होईल. सदर आदेश 26 फेब्रुवारी 2024 पासून अमलात येईल.

– मिलिंद काळेश्वरकर आयुक्त अन्न व औषध प्रशासनय,वतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here