वणीत सत्यपाल महाराजांची सत्यावाणी. एकाच वेळी वाजणार सात खंजिरी.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जैन लेआउट माऊली परिवाराचे आयोजन.
राजू तुरणकर–संपादक लोकवाणी जागर.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सुप्रसिद्ध समाज सुधारक महाराष्ट्र भूषण सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणीचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम 9 जानेवारी 2024 रोजी मंगळवार ला संध्याकाळी सात वाजता वणी शहरातील जैन लेआऊट येथील माऊली मंदिर परिसरात आयोजित केला आहे.
सत्यपाल महाराज यांना आधुनिक काळातील समाजसुधारक म्हणून पाहिले जातात. सत्यपाल महाराज समाजाचे अधार्मिक स्वरूपाकडे लोकांचे लक्ष वेधून सत्य साकार करण्याचे काम करत आहेत. खराब परंपरेवरही महाराज गंभीर टीका करतात, ज्यामुळे कीर्तनात बसलेल्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येते आणि त्यांचे विचार बदलतात.
सत्यपाल महाराज सप्त खंजिरीवाले महाराष्ट्रात माहित नाही असे गाव-खेडे सापडणार नाही. तुकडोजी महाराजांची खंजिरी सत्यपाल महाराजांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेरही कीर्तनाच्या माध्यमातून जनामनात पोहोचवली. एकाच वेळी सात खंजऱ्या वाजविणारे सत्यपाल महाराज या करामतीने महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावले. सदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.