वणी-शिंदोला मार्गे आवाळपूर गडचांदूर बस सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी.
वणी एस टी डेपोला सरपंच ग्रा.पं. वेळाबाई यांचे विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.
राजू तुराणकर संपादक लोकवाणी जागर
वणी तालुक्यातील नागरीक विशेष करून तालुकास्तरीय कामासाठी वणी शिंदोला, कळमना, गडचांदूर राज्यमार्ग लगत शेतकरी, शेतमजुर, कामगार हे चंद्रपूर-यवतमाळ सिमेलगत दालमिया सिमेंट कपंनी, अंबुजा, एल. अँड. टी कंपनीत कामावर ये-जा करणे तसेच वणी व गडचांदूर या दोन्ही बाजारपेठेत दोन्ही जिल्हयातील नागरीकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात येणे-जाणे करतात.
शिदोला- वणी कृषी बाजारपेठेत गडचांदूर, कोरपना जिल्हा चंद्रपूर येथून शेतकरी, शेतमजुर याना प्रवासा करिता, विद्यार्थी, कामगार सिमेलगतचे नातेवाईक यांना हा प्रवास सुलभ व जवळचा असल्याने आर्थिक दृष्ट्या परवडणारा आहे. तसेच महामंडळाला या रस्त्यावरुन चांगले उत्पन्न मिळेल. यापूर्वी या रस्त्यावर वणी-गडचांदूर बस सुरु होती. या रस्त्यावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगांव, शेलु, शिरपुर, मेंढोली, खांदला, बोरगांव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, चनाखा, पाथरी, परमडोह, कळमना तसंच वनोजा, आवाळपूर, नांदा बिबी अश्या २५ गावातील प्रवाश्यांना होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता विजय पिदूरकर माजी जि.प.सदस्य यांच्या नेतृत्वाखाली वेळाबाई ग्रामपंचात सरपंच बांदुरकर, उपसरपंच संदीप मेश्राम व गावकऱ्याकडून मागणी करण्यात आली आहे.