जनदोन दिवसानंतर गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषणाची सांगता.
नियमबाह्य ग्रामसभा व कागदपत्राच्या आधारे केली होती आशा सेविकेची निवड.
आनंद नक्षणे— मारेगाव : तालुक्यातील गोंडबुरांडा ह्या पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मधे अफलातून कामगिरी झाल्याचे विरोधात ग्रामस्थानी रविवार पासून आमरण उपोषणचे हत्यार उपसले. त्याची आज ता.१६/१०/२३ ला संध्याकाळी मारेगाव चे गट विकास अधिकारी यांचे मध्यस्थीने योग्य न्याय मिळवून देण्याच्या आश्वासना नंतर सांगता झाली.
सविस्तर बातमी अशी की,ता.०५/०६/२३ रोजी घेतलेली ग्रामसभा व त्यात घेतलेला ठराव हा खोटा असून बनावट आहे.ह्या अफलातून प्रकारात ग्रामपंचायत सचिवाने पेसा कायद्याची पायमल्ली करत गैर आदिवासी उमेदवाराची निवड केली.याला पंचायत समितीचे अधिकारी पाठीशी घालत असून मूग गिळून गप्प आहे.म्हणून या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी.अशी मागणी उपोषण कर्त्यांची होती.
उपोषण्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर उपोषणाची दखल घेत, मारेगाव गट विकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन देत ता.१६/१०/२३ रोजी चर्चा करून ता.०५/०६/२3 रोजी गोंडबुरांडा येथील झालेल्या ग्राम सभेमध्ये आशा सेविकेची निवड योग्यरित्या झाली की नाही याची त्वरित चौकशी करून संबंधित ग्राम पंचायत सचिवा विरुद्ध नियमानुसार ८ दिवसात कारवाई करण्यात येइल. असे आश्वासन देऊन उपोषण कर्त्यास आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेवटी फळांचा रस पाजून उपोषणाची सांगता झाली.
दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेकडे ग्रामवसियांचे लक्ष लागले आहे. सचिवावर कारवाई न झाल्यास या पेक्षा मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मत उपोषणकर्त्यानी लोकवाणी जागर जवळ व्यक्त केले.