नऊ वर्षाच्या मो. अलीने पूर्ण केला पहिला रोजा !
पत्रकार इकबाल यांच्या सुपुत्राची अल्ला प्रती श्रद्धा.
राजू तुराणकर – संपादक लोकवाणी जागर
येथिल काळे ले आऊट नगर मधील मो. अली मोहम्मद इक्बाल शेख या नऊ वर्षांच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला राजा पुर्ण केला. याबद्दल अली चे मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले.
इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.
अलीने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो सकाळी पाच वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अली ला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला.
मो.अली हा पत्रकार इक्बाल शेख यांचा मुलगा आहे.