वणीच्या तरुणाचा चंद्रपुरात मृत्यू.

0
822

गणेश विसर्जन मिरवणूकी बॅन्ड
वादकाचा मृत्यू. वणीच्या तरुणाचा चंद्रपुरात मृत्यू.

राजू तुरणकर— वणी.

शहरातील भिमनगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा गुरूवारी रात्री चंद्रपूर येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत बॅन्ड वाजवीतांना दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वणी भीमनगर येथील सिध्दार्थ मरकवाडे वय ३० वर्ष असे मृतक तरूणाचे नाव आहे. सिध्दार्थ हा एका बॅन्ड पथकात बॅन्ड वाजविण्यासाठी चंद्रपूर येथे गेला होता. बॅन्ड वाजवीत असताना अचानक त्याला चक्कर आली, व तो खाली कोसळला त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सिध्दार्थ हा श्रमाला महत्व देणारा होतकरू तरुण होता.तो फोटोग्राफी व्यवसाय करून सोबतच वणी नगरपरिषदेच्या घंटागाडी वर चालक म्हणून सुध्दा काम करीत होता. होतकरू तरुणाचा अनपेक्षित मृत्यूने भिमनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
सिध्दार्थ यांचे मागे पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here