कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याविरोधात मारेगाव पुरोगामी पत्रकार संघटना आक्रमक.
शासनाच्या धोरणाचा निषेध.
आनंद नक्षणे—मारेगाव.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये समाविष्ट करण्यात येईल या शासनाच्या निर्णयाविरोधात मारेगाव तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देण्यात आले.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून त्यांचे केंद्रीय शाळेमध्ये विलीनकरण करणे असा महाराष्ट्र शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील शाळा ओस पडणार आहे. ज्यांचे पोट हातावर आहे अशा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. खेडेभागातील गरीब विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार आहे. आणि पुन्हा जुण्यासारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते ही समस्या डोळ्यासमोर ठेऊन शासनाने हा निर्णय मागे घ्यावा याकरिता मारेगाव तालुका पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भास्करराव धानफुले, मोरेश्वरराव ठाकरे, भास्कर राऊत, सुमित गेडाम, सुरेश नाखले, गजानन देवाळकर, धनराज खंडरे,सुमित हेपट, गजानन आसूटकर, शरद खापणे, भैय्याजी कनाके, आनंद नक्षणे, सुरेश पाचभाई, प्रफुल ठाकरे, ज्योतिबाजी पोटे उपस्थित होते.