स्माईल फाउंडेशनची गरजवंतांना दिवाळी स्माईल

0
239

स्माईल फाउंडेशने दिवाळीत आणली गरजवंतांच्या चेहऱ्यावर स्माईल.

साजरी केली आगळी वेगळी दिवाळी.

राजू तूरणकर —संपादक.

वणी: आज शुक्रवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुर्गम आदिवासी पाड्यात व वॉटर सप्लाय येथे गरजूंना कपडे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. दुपारी 12 वाजता पासून ते 5 वाजेपर्यंत एसपीएम शाळेजवळ, वॉटर सप्लाय व मारेगाव तालुक्यातील सोनूपोड, गावपोड, सालईपोड येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.स्माईल फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राबविण्यात आला.

शहरातील 300 पेक्षा गोर गरीब, ज्यांची आर्थिक परिस्थितीत हलाखीची आहे अशा लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या कपड्यांमध्ये नवीन साड्या, जीन्स, पॅन्ट, छोट्या मुलांचे नवीन कपडे, चादर, शॉल, नवीन शूज इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. यात संपूर्ण कपड्यांमध्ये 90 टक्के कपडे हे नवीन होते उर्वरीत कपडे हे सुस्थितीतील जुने कपडे होते . गेल्या काही दिवसांपासून स्माईल फाउंडेशनच्या वतीने लोकसहभाग व दानशुरांच्या मदतीने कपडे गोळा करण्याचे काम सुरु होते.मोठ्या प्रमाणात कपडे जमा झाल्यामुळे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम,  सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे , अनिकेत वासरीकर, घनश्याम हेपट, मयूर भरटकर, राज भरटकर, कार्तिक पिदुरकर,  विष्णु घोगरे इत्यदि सदस्य उपस्थित होते.

1 COMMENT

  1. *नमस्कार*,🙏🙂 *आजपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा.*
    🪔🏮 *|| शुभ दिपावली ||*🪔
    *९ नोव्हेंबर २०२३- वसुबारस !*
    गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
    प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
    लाभो !
    🪔🏮
    *१० नोव्हेंबर २०२३- धनत्रयोदशी !*
    धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
    निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
    धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
    🪔🏮
    *१२ नोव्हेंबर २३- नरकचतुर्दशी !*
    सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
    अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
    आपल्याला लाभो !!
    आपल्याकडून नेहमी सत्कर्म
    घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
    🪔🏮
    *१२ नोव्हेंबर २०२३- लक्ष्मीपूजन !*
    लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
    नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
    होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
    आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
    🪔🏮
    *१४ नोव्हेंबर २०२३- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
    पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
    गोडवा यावा! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
    आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
    🪔🏮
    *१५ नोव्हेंबर२०२३- भाऊबीज !*
    जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूटn
    राहू दे !
    *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
    *आंनदाची आणि भरभराटिची जावो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.*🌹

    शुभेच्छुक,
    सरपंच शंकर नारायण वालकोंडे चारगाव 🙏🙏🏻🙏🏻

Leave a Reply to Shankar Narayan Walkonde Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here