- रवी बोढेकर यांना मातृशोक.
- सुभद्राबाई रामाजी बोढेकर यांचे निधन.
वणी : शिवसेनेचे माजी वणी तालुका प्रमुख रवी रामजी बोढेकर यांच्या मातोश्री सुभद्राबाई रामाजी बोढेकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले.
त्या मूळ पाखडगाव येथील रहिवासी असून त्यांचे निधन वणी प्रगती नगर (बजरंग नगर) येथील राहत्या घरी झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई व मोठा परिवार असा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंतिम यात्रा आज सकाळी ११ वाजता त्यांच्या वणी येथील निवासस्थानावरून निघून वणी येथील मोक्षधाम येथे पार पडणार असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.









