गणेशपुर येथे श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त महामानवांना अभिवादन.

0
92

श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त महामानवास स्वरादरांजली.

भीम शाहीर मनोज राजा गोसावी यांचे यांच्या कव्वाली गायनाचा कार्यक्रम संपन्न.

राजू तुरणकर — संपादक लोकवाणी जागर

संत गाडगेबाबा,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पचारे परिवार छोरीया वसाहत गणेशपुर  वणी येथे महामानवाना आदरांजली वाहण्यात आली.
या निमित्ताने पहाटे परिसर सफाई करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज भजन मंडळ दहेली व गुरुदेव सेवा भजन मंडळ नवेगाव, विरकुंड यांच्या भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.सायंकाळी सर्वधर्म प्रार्थनेत ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, शिवधर्म,  मुस्लिम व वैदिक धर्माच्या धर्मगुरूंनी आपापल्या धर्माच्या प्रार्थना घेवून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. यावेळी सर्वही धर्मगुरूचा पचारे परिवारातर्फे शाल श्रीफळ व ग्रामगीता भेट देवून सन्मान करण्यात आला. प्रार्थनेचे महत्त्व जिल्हा सेवाधिकरी पद्माकर ठाकरे यांनी विषद केले.त्यानंतर नागपूर येथील भीमशाहीर मनोज राजा गोसावी यांच्या कव्वाली गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गायक मनोज गोसावी यांनी संत व धर्म कार्य अविरतपणे करीत असल्याने गुणवंत पचारे व रुपाली पचारे या दाम्पत्याचा संविधान भेट देवून सत्कार केला.

पुण्यतिथी महोत्सवासाठी संपूर्ण पचारे परिवार नातेवाईक तथा अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ विठ्ठलवाडी यांचे अनमोल सहकार्य लाभले.या कार्यक्रमात संजय देरकर व किरण देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सूत्र संचालन विजया दहेकर यांनी तर आभार मारोती ठेंगणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here