क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गणेशपुर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
157

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गणेशपुर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

सप्त खंजिरी वादक क्रांती काळे यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम.

महिला समारोह समिती व छत्रपती महोत्सव समिती च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

राजू तुराणकर संपादक लोकवाणी जागर.भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ तसेच कवीयित्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाती आणि लिंगांवर आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे.

सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी 1884 मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या अशा या महान क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३जानेवारीला गणेशपुर येथे सकाळी ९.३० वा. भव्य मिरवणुक व वेशभुषा स्पर्धा आयोजित केलीआहे. यात विशेषतः गुणवंत पचारे सर संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. छत्रपती स्मारक येथून गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे.

सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिभाताई धानोरकर आमदार, भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्र विशेष अतिथी सिता वाघमारे प्रभारी सहा निरीक्षक वाहतूक विभाग वणी, मायाताई चाटसे सहायक पोलिस निरीक्षक वणी, किरणताई देरकर संस्थापिका सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, संगीता संजय खाडे अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या वणी , प्रमुख पाहुणे, आशाताई मनोज जुनगरी सरपंच गणेशपुर, विना पावडे , ॲड. रुमेरा शेख अहिले, विजया ठाकरे, सुनिता बोढे, रुपाली आवारी, मनिषा घोटकर, विद्या विधाते, सुरेखा बलकी, विद्या भगत, करिश्मा आसुटकर, वर्षा घाटे, उपस्थित राहणार आहे.

उद्घाटनिय समारंभा नंतर जाहिर व्याख्यान सुजाता गुरनुले, कु. अमीषा गहूकार, कार्यक्रम आयोजित केला आहे.सायं. ६.०० वा. समाज प्रबोधनपर क्रांती काळे यांचे जाहिर किर्तन, प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला तमाम जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह समिती, सन्मान स्त्रीशक्ती फाऊंडेशन, गणेशपुर छत्रपती महोत्सव समिती व मित्र परिवार गणेशपुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here