बारजवळ तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, वणी परिसरात गुंडागर्दी ला उधाण.
पोलिसांचा वचक उरला नाही. नित्याच्या झाल्या मारहाणीच्या घटणा.
लोकवाणी जागर वणी
तरुणाशी अकारण वाद घालत त्याला लोखंडी रॉडने मारहान केल्याची घटना २ ऑगष्टला वासेकर ले-आऊट येथील कार्निवल बारजवळ घडली. याबाबत तरुणाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नरेश दिगांबर पाते (४०) रा. वासेकर ले-आऊट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील अरविंद चिंचोळकर (२४) हा वासेकर ले-आऊट येथे राहतो. १ ऑगष्टला तो निर्गुडा नदीच्या गणेशपूर पुलावर मासे पकडण्याकरिता गेला होता. त्यावेळी नरेश पाते याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु होता. त्यानंतर स्वप्नील हा तेथून घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी स्वप्नील आपल्या दुचाकीने कार्निवल बारजवळून घराकडे जात असतांना नरेश पाते याने त्याला अडविले. तू काल तेथे काय करत होता, तू दादागिरी करू लागला काय, असे म्हणत त्याने घरून लोखंडी रॉड आणला. लोखंडी रॉड त्याने स्वप्निलच्या डोक्यावर मारण्याकरिता उगारला असता स्वप्नील याने त्याचा वार हाताने रोखला. मात्र दुसरा वार त्याने मांडीवर केल्याने स्वप्नील याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २ ऑगष्टला नरेश दिगांबर पाते याच्या विरुद्ध सेटशनला तक्रार नोंदविली.








