वणी नगर परिषदेत ‘पैसे देऊ नका’चे आवाहन—म्हणजे आतापर्यंत काय सुरू होतं? प्रशासनावर थेट संशय ! चर्चेला उधाण.

0
716

वणी नगर परिषदेत ‘पैसे देऊ नका’चे आवाहन—म्हणजे आतापर्यंत काय सुरू होतं? प्रशासनावर थेट संशय !

वणी नगर परिषदेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ? सभापतींच्या आवाहनामुळे “मिशन निर्गुडा”  गृपवर चर्चेला उधाण.

राजु तुरानकर – वणी नगर परिषद नियोजन विभागाकडून नागरिकांना “कोणालाही पैसे देऊ नका” असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. मात्र या आवाहनामुळेच आता मोठा सवाल उभा राहिला आहे—आतापर्यंत नेमकं काय सुरू होतं?
जर सर्व कामे नियमांनुसार आणि अधिकृत शुल्कानुसारच होत असतील, तर नागरिकांना असे इशारे देण्याची वेळ का आली? या सूचनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फक्त नियोजन विभागच नव्हे, तर इतर विभागांमध्येही अशाच प्रकारचे व्यवहार सुरू आहेत का, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अधिकाऱ्यांनाच महत्त्वाच्या पदांवर बसवले जाते, ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे.

वणी शहरातील एकमिशन निर्गुडा” या सोशल मीडियाच्या ग्रुप वरती अनेक लोकांनी नियोजन सभापती लक्ष्मण उरकुडे यांनी नियोजन कार्यालयात  फलक लावल्यामुळे, सदर बाबी वरती प्रचंड अशी वादळी चर्चा काल रात्री झाली.  त्यामध्ये आबिद हुसैन,जितेंद्र कोठारी, राजू तुरानकर, प्रवीण खानझोडे, विक्रांत चचडा, अजिंक्य शेंडे, विशाल दुधबले , जयंत देवडे, रवी कांबळे, राजु पिंपलकर, विजय कडूकर, विवेक कोटावार यांनी शहारातील विषयावर गंभीर अशी चर्चा केली व शहरांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्ट प्रशासनावर अंकुश लावण्याच्या भावना व्यक्त केल्या.
चार वर्षांपासून मुख्याधिकारी प्रशासकाच्या भूमिकेत असल्यामुळे प्रशासनावर ‘एकहाती कारभार’ केल्याचे आरोपही जोर धरत आहेत. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या यंत्रणेत पारदर्शकतेचा अभाव आहे का, हा प्रश्न आता थेट विचारला जात आहे.
नगर परिषदेकडून दिलेले आवाहन हे जनजागृती आहे की आतल्या गैरव्यवहाराची कबुली? याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here