पिंपळखुटी चेक पोस्ट बनले वसुलीचा अड्डा, तस्करीच्या वाहनांना केल्या जाते सहकार्य…
पिंपळखुटी नंतर करंजी जवळ वाहन तपासणी कश्यासाठी, कर्मचारी कमी कसल्याचा कायवा करणारी वाहतूक शाखा करंजी जवळ किती कर्मचारी उभे ?
परवेज खान केळापूर : तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. पांढरकवडा आदिलाबाद महामार्ग क्रमांक ४४ वरती पिंपळखुटी चेकपोस्ट आहे .महामार्ग म्हंटल्यावर लाखो वाहने दिवसरात्र येणे जाने सुरूच असते.. आणि अनेक वाहने या महामार्ग वरून तस्करी करतात. या तस्करीच्या वाहनांना मूक संमत्ती देऊन दिवसभरात लाखो रुपयाचा गल्ला जमा केल्या जातो.. हि वसुली करण्यासाठी काही खाजगी पंटर ची नेमणूक केलेली आहे .हे खाजगी पंटर अवैध वसुली करतात. येथे प्रत्येक महिन्याला अधिकारी बदलाविला जातो. येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक अमरावती येथून केल्या जाते. अवैध्य वसुली संदर्भात कोणी तक्रार केल्यास तक्रार करणाऱ्या व्यक्तीची बोलती बंद करण्यासाठी साम,दाम ,दंड ,चा वापर केल्या जात असतो. त्याच बरोबर अवैध्य केलेली वसुली खालून तर वरपर्यंत पोहचविण्यात येते.
पिंपळखुटी येथे वाहन तपासणीच्या नावाखाली अनेक वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी उभा असणारा कर्मचारी वर्ग सेवा कमी व मेवा जास्त या रुबाबात वागत असल्याने. वाहन धारकांना चुकून असल्यास शिक्षा ऐवजी जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करून प्रकरणे हाताळत असल्याने, तस्करीचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहणारे इसम बोलून दाखवत आहे.
पिंपळखुटी येथे वाहनांची तपासणी केल्या नंतर पुन्हा करंजी रोड जवळ महामार्गावर वाहनांना थांबवून पुन्हा तपासणी केली जाते, ती कश्यासाठी हा प्रश्न सर्व सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे. एकीकडे कर्मचारी कमी असल्याचे वाहतूक शाखा नेहमी ओरड मारत असते तर करंजी महामार्गावर दहा पेक्षा अधिक कर्मचारी रोडवर उभे राहून वाहने तपासात असल्याचे चित्र पाहून सामान्य माणूस गालात ल्या गालात हसून, पोलिसांची धावपळ पाहून, वाहतूक शाखेची दिशाहीन वाटचाल पाहून आपला रस्ता पार करून पुढे जातो…