मॅकरून शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन….

0
123

मॅकरून शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन….

“तो ” हुबेहूब पेहराव करुन असलेल्या बलिकेने दिले क्रांतिज्योती चे दर्शन आणि कार्यक्रमात आली रंगत.

राजु तुरणकर: – वणी स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारं उघडून ज्ञानाची गंगोत्री निर्मिती करणाऱ्या थोर समाजसुधारक,स्री क्रांतिकारक स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती “सावित्रीबाई फुले” यांची 194 वी जयंती तालुक्यांतील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस .ई वणी येथील शाळेत उत्साहात पार पडली.विशेष म्हणजे वर्ग 2 री ची विद्यार्थीनी प्रांजली प्रवीण देठे हिने सावित्रीबाईंचा हुबेहूब पेहराव करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे दर्शन झाल्यागत उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना पेहराव पाहून अतिशय आनंदित झाले व कार्यक्रमाची रंगत व शोभा वाढली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचा मुख्यद्यापीका शोभना मॅडम या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस हारार्पण व दीपप्रज्वलन करुण करण्यात आलें. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्रियांसाठी शिक्षण तसेच अज्ञान व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण म्हणून विद्या स्वप्नील पाटील या शिक्षिकेने मनोगत व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांचा जीवन पटावर प्रकाश टाकला. यावेळी समस्त विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थिती होतें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here