सेवानिवृत्त शिक्षक हरिप्रसादजी पांडे यांचे निधन.
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव व वणी तालुक्यांतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सेवानिवृत्त शिक्षक हरिप्रसाद पांडे यांना वृद्धापकाळाने आज दिनांक ०५/०१/२०२५ रोजी देवाज्ञा झाली, व त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर आज सायंकाळी ०४.वाजेपर्यंत लर्नर्स अकॅडमी कॉन्व्हेंट मारेगाव येथे अंतिमदर्शनाकरिता ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्यविधी आज सायंकाळी मोक्षधाम मारेगाव येथे कऱण्यात येणार आहे.
आज रविवारी सकाळी 9.15 वाजता त्यांची प्रांणज्योत मालविली. हरिप्रसाद पांडे यांच्या माठीमागे पत्नी गीतादेवी, वृतपत्र संपादक शैलेश पांडे नागपुर, नायब तहसीलदार विवेक पांडे वणी , एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कल्पना माळोदे (पांडे ), प्रा. सतीश पांडे मारेगाव, नातवंडं, सूना असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.