सई मोकलकरची ऐतिहासिक कामगिरी; अमरावती बोर्डातून ९९.६०% गुणांसह प्रथम.
अनिकेत तुराणकर वणी तालुक्यात दुसरा; सर्वसाधारण कुटुंबातील अमन दोडकेची ९०% गुणांसह यशस्वी भरारी.
राजु तुरानकर वणी : दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात सई सतीश मोकलकर अमरावती हिने तब्बल ९९.६० टक्के गुण मिळवत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री संत संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीत सईने मिळवलेले यश समाजाची मान उंचावनारा निकाल असल्याने समाज बांधव तिच्या आईवडिलाबद्दल गौरव व्यक्त करत आहेत.
त्याचप्रमाणे, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतील अनिकेत मधुकर तुराणकर यानेही उत्कृष्ट यश मिळवत ९७ टक्के गुणांसह वणी तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंब, शिक्षक व मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तर सर्वसाधारण कुटुंबातील वणी येथील अमन माधुरी अनिल दोडके यानेही ९० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशाची भरारी घेत अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

या तिन्ही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. निकाल जाहीर होताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि धोबी परीट सर्व भाषिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष देवरावजी सोनटक्के यांनी फोन वरुन शुभेच्छा देवून अभिनंदन केले तसेच समाजबांधवांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे वणी तालुक्याचा शैक्षणिक गौरव वाढला असून, धोबी समाजाची मान उंचावली आहे,” अशा भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत आहेत.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा.











