ई वर्ग जमीन हर्रास करुन केली बोगस कामे :- लढा संघटना.

0
693

ई वर्ग जमीन हर्रास करुन केली बोगस कामे :- लढा संघटना.

टेंडर प्रक्रिया न राबविता मर्जीतील लोकांना कामे देवून करोडो रुपयांची अफरातफर- महिती अधिकारातून गंभिर बाबी उघड.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे दिनांक 30/9/2022 ला ई वर्ग जमीन हर्रासाचे जमा रकमेतून खर्चास मंजुरी प्रदान करण्यात आली.त्या अनुशंगाने मा.गटविकास अधिकारी वणी यांनी 34 जिल्हापरिषद शाळेत एकूण 1,40,42,320 रुपयाची कामे केली. ही सर्व कामे शाळा व्यवस्थापन समिती अथवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला विचारत न घेता निविदा प्रक्रिया न राबविता मार्जितल्या ठेकेदाराला सर्व कामाचे कंत्राट दिले असून गटविकास अधिकारी वणी यांनी मोठा भष्ट्राचार व कामात प्रचंड अनियमितता केल्याचे दिसून येत आहे.

महिती अधिकारात मिळालेल्या महिती नुसार गंभिर बाबी.

माहिती अधिकार मधून मिळालेल्या माहितीनुसार कामात अनियमितता व निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याचे स्पष्ट होते.
1)अनेक प्रशासकीय मान्यता पत्रावर गटशिक्षणाधिकारी यांच्या सह्या नाही. 2) सर्व 34 जि. प. शाळेत केलेल्या कामचा दर्जा हा निकृष्ठ आहेत 3) कुठल्याही शाळेचे मागणीपत्र नाहीत त्यामुळे कोणत्या अधिकारात काम करण्यात आले.4) एकीकडे पटसंख्या कमी शैक्षणिक दर्जा घसरत असताना अचानक काम करण्याचे काय कारण.5)शाळा समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना बांधकाम करताना विस्वासात घेण्यात आले नाही. यावरून केवळ पैसा खर्च दाखवून भ्रष्टाचार करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर कामे केल्याचे स्पष्ट होते.

त्यामुळे या सर्व कामाच्या चौकशीची मागणी लढा संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण खानझोडे व विकेश पानघाटे व विवेक ठाकरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here