Home Breaking News 20 मे पासून बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा अद्याप शोध नाही; नागरिकांना मदतीचे...

20 मे पासून बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा अद्याप शोध नाही; नागरिकांना मदतीचे आवाहन.

0
438

20 मे पासून बेपत्ता असलेल्या वृद्ध महिलेचा अद्याप शोध नाही; नागरिकांना मदतीचे आवाहन.

आपल्या एका फोनमुळे एका चिंताग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकतो. सोसियल मीडियाचा सदुपयोग करूया.

वणी : शहरातील भीमनगर परिसरातील 80 वर्षीय वृद्ध महिला श्रीमती कमलाबाई साधुजी नगराळे या दि. 20 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घरातून निघून गेल्या असून अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कमलाबाई नगराळे या भीमनगर, एस.पी.एम. शाळेच्या मागे, वणी येथे वास्तव्यास आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरातून बाहेर पडल्यानंतर परतल्या नाहीत. त्यांना थोडासा मानसिक आजार असून घरातून निघताना त्यांनी अबोली रंगाचे पातळ (साडी) परिधान केले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून नातेवाईक व कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सदर महिला आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : भोजराज साधुजी नगराळे, भीमनगर, वणी

📞 मोबाईल : 8551914277

आपल्या एका फोनमुळे एका चिंताग्रस्त कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!