घरकूल धारकांची रेती गेली कूठे, रेती अभावी बांधकामे बंद…. जनहित कल्याण संघटना आक्रमक.

0
112

घरकूल धारकांची रेती गेली कूठे, रेती अभावी बांधकामे बंद…. जनहित कल्याण संघटना आक्रमक.

तहसीलदार यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा.

राजु तुरणकर- संपादक.

मारेगांव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सरकारी योजनेतून घरकुल मंजुर झालेले आहे. या घरकूल धारकांना मोफत वाळू उपलब्ध करुण देण्याचे सरकारी धोरण आहे. यांची नोंदणी करुण त्यांना रेती वाटप करण्यात यायला पाहिजे. परंतु संबंधीत घरकुल धारकांना रेती मिळत नसल्याने त्यांचे बांधकाम बंद आहे. तसेच रोज सेतुव्या लिंकवर चढलेला माल रेती तस्कर लंपास करीत असल्याचा आरोप करीत जनहित कल्याण संघटना यांनी तहसीलदार मारेगाव यांना निवेदन दिले आहे.

मारेगाव तालुक्यांतील घरकुल धारक रोज सेतुमध्ये रेती संदर्भात विचारणा करण्यासाठीं पायपीट करीत असून, तहसिल प्रशासन त्यांना उडवाउडवीचे उत्तर देतात यावरून महसूल प्रशासनाच्या मुक संमतीने रेती रेती तस्कर मुजोर झाले असून रेती उपसा करुण केवळ स्टॉक करण्याच्या ठेका असलेले रेती घाटाचे ठेकेदार रेतीचे मालक बनून रेती विकून अमाप पैसा जमा झाल्याने सैराट झाले आहे व घरकुल धारक त्रस्त झालेले आहे.

सरकारी लिंकवर चढलेला माल कुठे जात आहे,  तसेच लिंकवर रेती स्टॉक किती चढविला जातो यावरून महसूल अधिकाऱ्यांवर जनहित संघटनेने प्रश्न उपस्तीत केले असून महसूल अधिकारि यांनी तातडीने प्रकरणांत लक्ष देत घरकूल धारकांना रेती उपलब्ध करुण देण्याची मागणी करण्यात आली असून, तसे न झाल्यास घरकूल धारकांचा मोर्चा काढून आंदोलन छेडणार असल्याचे समीर कुळमेथे,गौरव आसेकर,रॉयल सयद,निलेश तेलंग, कपिल कुळमेथे, अलताफ कुरशी, मोसीम कुरेशी, गोलू बडभोर, तुषार पवार, मोहित गोडाम, तौहीद शेख, पियुप डंभारे, कर्तिक पूनवटकर. यांनी मारेगाव तहसीलदार नीलावड यांना निवेदन दिल्यानंतर लोकवाणी सी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here