ब्राम्हणी, उकणी परिसरातील युवकांनी बांधले शिवबंधन.
शिवसेनेत नवचैतन्य, रोज युवकांचे लोंढे होत आहे शिवसेनेत दाखल…
राजु तुरणकर – संपादक.
आमदर संजय भाऊ देरकर यांच्या मार्गदर्शनात अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख यांचा नेतृत्वात ब्राम्हणी व उकणी परिसरातील अनेक युवकांनी आमदार संजय भाऊ देरकर यांचे निवासस्थानी येवून योगेश उपरे यांचे संयोगाने, गणेश दिलीप काळे, रूपम निमसटकर यश उपरे, सुमित काळे, कुणाल काळे विश्वराज उपरे , संदीप बोधे, प्रमोद शेंडे, रुपेश उपरे, यश खामनकर, दिगांबर चामाटे, वासुदेव काळे,मारुती मंगाम या युवकांनी आमदार संजय भाऊ देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय देठे सहकार सेना जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ शिवसैनिक मोरेश्वर उज्वलकर उपस्थित होते.
विद्यार्थी व बेरोजगारांच्या हक्कासाठी लढणारे व्यासपीठ म्हणजे युवासेना अजिंक्य शेंडे – युवासेना ही केवळ राजकीय संघटना नसून वणी विधानसभा क्षेत्रातील तरुणांच्या शिक्षण, रोजगार, पर्यावरण, क्रीडा, आणि सामाजिक विषयांवर काम करणारी चळवळ आहे. तिने विद्यार्थ्यांचे हक्क, शिक्षण प्रणालीतील त्रुटी, आणि बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. या संघटनेने अनेक उपक्रम आणि मोहिमा राबवल्या आहेत, जसे की पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत. युवासेना तरुणांना नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यासाठी एक मंच प्रदान करते आणि त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करते. युवासेना हे केवळ तरुणांचे संघटन नसून, त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशादर्शन देणारे एक शक्तिशाली माध्यम आहे, जे आजच्या आणि भविष्यातील तरुण पिढीला प्रेरणा देत राहते म्हणुन तालुक्यांतील असंख्य तरुण पिढीआता युवासेना, शिवसेनेकडे आकृष्ट होत आहे.











