“थोडस जगन समाजासाठी” सातत्यपूर्ण उपक्रमातून पचारे सरांचा संतांच्या विचारांचा प्रसार…..

0
294

“थोडस जगन समाजासाठी” सातत्यपूर्ण उपक्रमातून पचारे सरांचा संतांच्या विचारांचा प्रसार…..

मार्की (बु.) येथील निराधार महिलेला गुणवंत पचारे यांचा मदतीचा हात..

राजु तुरणकर – संपादक.

“थोडसं जगणं समाजासाठी” या उपक्रमांतर्गत गुणवंत पचारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंतीच्या निमित्ताने ३० एप्रिल २०२४ ला केलेल्या संकल्पाच्या अनुषंगाने अखंडितपणे देत असलेल्या अन्नधान्य व साडीचोळी दानाचा कार्यक्रम दिनांक १९ मार्च ला मार्की (बु.) ता. झरी येथे श्रीमती शांताबाई मडावी या निराधार महिलेला महिनाभऱ्याचा किराणा, अन्नधान्य, भाजीपाला व साडीचोळी देऊन संपन्न करण्यात आला. याप्रसंगी अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा प्रचार प्रमुख मारोतराव ठेंगणे, मध्यवर्ती प्रतिनिधी ग्रामगिताचार्य विजयाताई दहेकर, ज्ञानेश्वर कडुकर, रुपालीताई पचारे तथा मार्की गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने हजर होते. या दानधर्माच्या कार्याला छोरिया वसाहत गणेशपूर येथील रहिवाशी निखिल झाडे यांनी स्वयंप्रेरनेने ३००० रुपयाचे सहकार्य दिले.या सत्कार्याचे प्रास्ताविक व आभार बंडू पारखी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here