वणी शहरात शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीचा पाकिस्तान विरोधी संताप; “माझं कुंकू – माझा देश” च्या घोषणांनी चौक दणाणला.
पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच खेळण्याच्या निर्णयाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया…
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याचा निर्णय जाहीर होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे तीव्र शब्दात निषेध करण्यात येवून राज्यभर आंदोलन उभे करून वणी विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीच्या वतीने आज वणी शहरात संतप्त आंदोलन उभं राहिलं. “माझं कुंकू – माझा देश” या हाकेला मोठ्या संख्येने महिलांनी प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून पाकिस्तान विरोधी घोषणांनी चौक दणाणून सोडला.

या आंदोलनाचे नेतृत्व किरणताई देरकर व जिल्हा महिला प्रमुख योगिताताई मोहोड यांनी केले. संतप्त महिलांनी “पाकिस्तान मुर्दाबाद”, “जय शाह ” यांच्या विरोधात अशा घोषणांनी वातावरण तापवलं. आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०२० कुंकवाच्या डब्या पाठवून महिलांनी क्रिकेट मॅच खेळण्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
किरणताई देरकर यांनी प्रतीकात्मक संताप व्यक्त करत चौकात टीव्ही फोडला. त्यानंतर महिलांनी क्रिकेट सामन्याचे प्रतीक म्हणून बॅट, बॉल आणि स्टम्प जाळून पाकिस्तानविरोधी निषेध नोंदवला. यावेळी जय शाह यांच्या विरोधातही महिलांनी तीव्र घोषणाबाजी केली.

महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या, “पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असतानाही भारत–पाकिस्तान सामना खेळणे म्हणजे शहीद सैनिकांच्या विधवांचा अपमान आहे. सरकारने या बहिणींच्या भावनांचा क्रूर छळ केलेला आहे व याची या दुटप्पी धोरणाच्या सरकारला किंमत चुकवावी लागणार आहे
या आंदोलनामुळे वणी शहरात वातावरण तापले होते. शिवाजी महाराज चौकात जमलेल्या महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी महिला उपजिल्हा संघटिका डिमन ताई टोंगे, सरपंच गीताताई उपरे,इंदुताई किन्हेकर, सरपंच रूपालीताई कातकड़े ,सुरेखाताई ढेंगळे, सुरेखाताई भोयर, पौर्णिमाताई राजुरकर, सविता ताई आवारी, सुनंदा ताई गुहे, शारदा चिंतकुंतलवार,रेखा बोबड़े,अर्चना पिदुरकर,पौर्णिमा भोंगळे,जिजाताई वरारकर, अरुणा कूचनकार, अमीना पठाण, यमुना हिरादेवर, रजनीताई टोंगे, किर्तीताई देशकर, संध्याताई कोकास, प्रगती घोटेकर, शुभांगी ठाकरे,मनिषा टोंगे , विद्या कालेकर, मीनाक्षी मोहिते, माधुरी सुंकूरवार , रेश्मा कातरकर, शुभांगी टोंगे, प्रभाताई खाडे,शालिनी देरकर, मीनाक्षी गायकवाड,सुजाता ठाकरे,विशाखा चौधरी,भोयर ताई उषा सुर, भाग्यश्री जुनगरी, मनिषा बोबडे, सविता दोडके व वणी विधान सभा क्षेत्रातील वणी-झरी-मारेगांव शिवसेना महिला आघाडीच्या समस्त रणरागिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.












