कारागृहातून सुटका होताच शिवसैनिकांचे फटाके फोडून स्वागत..
यवतमाळ, वडकी, मार्डी, वणी व शिंदोला येथे जंगी स्वागत….
वणी विधानसभा क्षेत्रात प्रथमच शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केले म्हणुन गंभीर गुन्हे दाखल…. शेतकरी वर्गात राज्यकर्त्या विरोधात रोष…..
राजु तुरणकर – लोकवाणी जागर– जगाचा पोशिंदा,बळीराजा लावावी तेव्हढी विशेषणे कमी पडतील असा शेतकरी आताचा घडीला आसमानी व उस्मानी संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. तो जगला पाहिजे व अश्या परिस्थितीतून त्याला मानोबल मिळावे व शासन दरबारी त्यांच्या व्यथा पोहचविण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी घेवून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्व 12 शिवसैनिकांवरती गंभीर स्वरूपाचे गून्हे नोंद केल्याने त्यांना यवतमाळ मध्यवर्ती कारागृहात टाकण्यात आले होते, त्यामध्ये आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय निखाडे, संतोष कुचनकर, राजू तुराणकर, डॉ. जगन जुनगरी, मारेगाव तालुकाप्रमुख पुरूषोत्तम बुटे, प्रेमानंद धानोरकर, भगवान मोहिते,दिवाकर कोल्हेकर, मोहम्मद अन्सार, गणपत लेडांगे, दिलीप काकडे, मनीष बत्रा, संकेत मोहिते, यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले या सर्वांची दि. 10 ऑक्टोबर न्यालयाच्या आदेशाने जामिनावर सुटका झाल्यानंतर यवतमाळ कारागृहाबाहेर, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष किशोर इंगळे, अमोल धोपेकर व शिवसैनिकांकडून भव्य स्वागत करण्यात आले.
वडकी येथे जंगी स्वागत
राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील,डॉक्टर संजय पवार राळेगाव तालुका सचिव यांच्या नेतृत्वाखाली, महिला आघाडी तालुकाप्रमुख मोघे मॅडम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढलेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे आणि त्यांचे टीम सर्व शिवसैनीकांचे वडकी येथे जल्लोषात जेलमधून सुटल्यानंतर स्वागत करण्यात आले यावेळी वडकी येथील बाबाराव महाजन, शरद सराटे ग्रामपंचायत सदस्य वडकी व इतर महिला पदाधिकारी उपस्तीत होते.

मार्डी येथे दिवाकर सातपुते, बंडु टोंगे, सचिन पचारे व अनेक शिवसैनिक उपस्थित असताना गुलाल उधळून जंगी स्वागत करण्यात आले.

वणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय देरकर,सुनील कातकडे, सुधीर थेरे, रवी बोढेकर, प्रकाश कराड, योगिता मोहोड,किरन ताई देरकर, डिमन टाँगे, गिताताई उपरे व असंख्य या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, वणी येथे मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि कर्जमाफीसाठी जोरदार घोषणा देत काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यांनी सोयाबीन व कपाशीची झाडे हातात घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती.
वणी शहरात तणाव, रात्री पोलीस ठाण्याला घेराव.
अटकेनंतर शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यवतमाळ वरून दंगल पथक बोलवण्यात आली होती.आणि पांढरकवडा, घाटंजी,वडकी, शिरपूर , मुकुटबन, पाटण पोलीस करण्यात आली होती. वणी पोलीस स्टेशनला रात्री शिवसैनिकांनी घेराव केला होता व शिवसैनिकांनी खोटे गुन्हा दाखल दाखल केल्याचा आरोप करीत त्यांना सोडण्याची मागणी केली होती.
अटकेनंतर दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांना सुटका व्हावी गुन्हे मागे घ्यावा म्हणून खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे , संतोष माहुरे, योगीता मोहोळ, किरन देरकर, डिमन टोंगे , सुरेखा ढेंगले, यांच्या सह हजारो शेकडो शिवसैनिक रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्यात आला होता.

वणी पोलीसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन वणी च्या कोर्टामध्ये शिवसैनिकांना हजर केले असता सात दिवसाच्या PCR ची मागणी करून दांडूकेशहीचा परिचय देत आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. व त्यामुळे शिवसैनिकांना यवतमाळ येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले.मात्र, आता जामिनावर सुटका झाल्यानंतर वणी शहरात या शिवसैनिकांचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी स्थानिक शिवसैनिक आणि जनतेचा मोठा पाठिंबा दिसून आला.
आमदार संजय देरकर शिवसैनिकांना मिळाले खंबीर व्यक्तिमत्त्व.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी प्रत्येक संघर्षात ताकद दिली आहे, प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची हिम्मत दिली आहे. त्यांच्या डोळ्यातून कार्यकर्त्यांसाठी असलेलं प्रेम, त्यांच्या निर्णयातून कार्याला किंमत देणार व्यक्तिमत्व, कार्यकर्त्याना हिंमत देणार नेतृत्व अशी प्रतीमा या शेतकरी आंदोलनातून दिसुन आली.
संकटात सापडलेल्या शिवसैनिकांना धीर देवून, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सातत्याने उभे राहून मदत करण्याच्या स्वभावामुळे आमदार संजय देरकर, किरणताई देरकर, यांनी शिवसैनिकांच्या हृदयात घर केले आहे. त्यामूळे निष्ठावंत शिवसैनिक खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसुन येत आहे.
गुन्हे दाखल झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना जमानातीवर बाहेर काढण्यासाठी आमदार संजय भाऊ देरकर यांचे मार्गदर्शनाखाली वकील व जमानतदारांची फळी उभी करून प्रशांत पाचभाई यांनी पोलीस प्रशासन व कोर्ट च्या माध्यमातून संघर्ष करून शिवसैनिकांना बाहेर काढण्यात यश मिळविले.












