उद्या गौराळा – वरूड टेकडीवर गायगोधन यात्रा. 

0
353

उद्या गौराळा – वरूड माडावार गायगोधन यात्रा.

अनेक वर्षापासून ची परंपरा शेतकरी , शेतमजुर व शेकडो गुराखी यांचे उपस्थितीत संपन्न होणार अविस्मरणीय सोहळा.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर 9422673123.

अनेक वर्षाची परंपरा असलेला यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गौराळा- वरुड मार्गावरील टेकडीवरील माळावर (मोठा देव मंदिर) बलिप्रतिपदेच्या दिवशी बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 11.30 ते 2 वाजेपर्यंत गायगोधनाचा सामूहिक सोहळा संपन्न होईल.
या गायगोधन सोहळ्यासाठी चिंचाळा, गवराळा, वरुड, आकापूर, नेत, पहापळ, पिसगाव, पाथरी इत्यादी गावचे गुराखी व शेतकरी आपाआपल्या गावातील सजविलेल्या गाईंना या ठिकाणी पूजेसाठी आणतील. मोठा देवाची पूजा व सजविलेल्या गाईंची मंदिराला प्रदक्षिणा होईल. याप्रसंगी गुराखी व त्यांचे सहकारी वादन गायन, गायगोधनाची गाणी, आरती व नृत्य करतील.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजयजी देरकर आमदार वणी विधानसभा मतदारसंघ} व सुरेश दळवे साहेब {उपविभागीय पोलीस अधिकारी वणी } उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम स्थळ वणी वरून पंधरा किलोमीटर तर माऱेगाव वरून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. कार्यक्रम स्थळी मद्यपान करून येणे, मद्यपान करणे व फटाके फोडणे याची सक्त मनाई आहे. व दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊन पुढे गुन्हे दाखल होईल याचे उपस्थित नागरिकांनी नोंद घ्यायची आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गायगोधनाचे असे सामुदायिक सोहळे अनेक ठिकाणी संपन्न होत असले तरी माडावरचा हा सोहळा टेकडी वजा परिसरात होत असल्याने प्रेक्षकांना दुरूनही नीट बघता येतो, त्यामुळे या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे उत्सव समितीतर्फे नम्र आवाहन.

यात्रे अनुषंगाने यात्रे संदर्भात काही माहितीसाठी संपर्क प्राध्यापक सुरेंद्र गोविंद नावडे गायगोधन उत्सव समिती सदस्य याच्याशी संपर्क करावा.
मो. 9404363495 / 9823285598

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here