माजी सैनिक नामदेवराव शेलवडे यांचे निधन.

0
577

माजी सैनिक , समाजसेवक, प्रसिध्द व्यक्तीमत्व श्री नामदेवराव शेलवडे यांचे निधन.

वणी शहर व परिसरात शोककळा.

राजू तुरणकर – संपादक.

वणी शहर व परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, माजी सैनिक, नगर सेवा समितीचे अध्यक्ष, समाजसेवक तथा बाजीराव महाराजांचे निस्सीम भक्त श्री.नामदेवराव शेलवडे यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.
मूळचे सुकनेगाव येथील असलेले श्री. शेलवडे यांचे वास्तव्य वणी येथील जिल्हा परिषद कॉलनीत होते. त्यांनी १९७२ च्या भारत–पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष पॅराशूटद्वारे पाकिस्तानच्या भूमीवर उतरून युद्धात सहभाग घेतला होता. भारतमातेचे ते निर्भीड व शूर पुत्र होते.

सन्मान कार्याचा उपक्रमा अंतर्गत मान्यवरांचा सत्कार करताना.सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात सेवा बजावली. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवेचा ध्यास घेत त्यांनी वणी शहरात नगर सेवा समितीची स्थापना केली. गेल्या पंधरा वर्षांपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसर, साई मंदिर, जैताई मंदिर परिसर येथे दर रविवारी अखंड स्वच्छता अभियान ते राबवत होते.
19 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगे बाबांच्या स्मृतिदिनी बस स्टँड वणी येथे ब्ल्यांकेट वाटप करताना.

याशिवाय चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात ते आपल्या सौभाग्यवती पत्नीसह दररोज सकाळी व संध्याकाळी जाऊन वृद्धांची सेवा सातत्याने करत होते. समाजसेवेचा हा वसा त्यांनी अखेरपर्यंत जपला.

राजा माता जिजावू जयंती दिणी, मुकुटबन चिखलगाव चौक येथे मानवंदना करताना

मागील चार महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी उत्तराखंड येथे रामदेव बाबांची भेट घेऊन चर्चा केली व उपचार केले होते. मात्र २ जानेवारी रोजी तब्येतीत अधिक बिघाड झाल्याने त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात गाठ असल्याचे निदान झाल्याने शस्त्रक्रियेची तयारी सुरू होती, परंतु त्याआधीच आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. ते 78 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव नागपुर वरुन सकाळी 11: 30 वाजता वणी शहरातील त्यांचे निवासस्थानी आणण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांचे पार्थिवावर वणी येथील मोक्षधाम मध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

प्रगती नगर येथे स्वच्छ्ता अभियान.   त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

माजी सैनिक, कर्तव्यदक्ष अधिकारी आणि निस्वार्थ समाजसेवक म्हणून श्री. नामदेवराव शेलवडे यांचे कार्य वणी शहराच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.
नगर सेवा समिती वणी, बाजीराव महाराज वृध्दाश्रम चिखलगाव,  व लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

रामदेव बाबांची उत्तराखंड येथे उपचार दरम्यान भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here