साडेचार वर्षीय चिमुरडीचा बेजबाबदार वाहतुकीचा बळी; भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू.

0
743

साडेचार वर्षीय चिमुरडीचा बेजबाबदार वाहतुकीचा बळी; भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू.

पोलीस शिपाई श्रीनिवास गोनलावार गंभीर जखमी.

राजू तुरणकर – संपादक.

वणी शहरातील मुकुटबन रोडवरील ताज हॉटेलसमोर दि. 24 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात साडेचार वर्षीय चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ड्रीमलँड सिटी येथील रहिवासी श्रीनिवास गोणलावार (वय 37) हे वणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून, काही कामानिमित्त ते आपल्या साडेचार वर्षीय मुलीसोबत मोटारसायकलने बाहेर गेले होते. काम आटपून घरी परतत असताना गणेशपूर–मुकुटबन रोडवरील ताज हॉटेलजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
धडक इतकी तीव्र होती की मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात मोटारसायकलवरील चिमुकली मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ नागरिकांच्या मदतीने सुगम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातात श्रीनिवास गोणलावार यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा क्रमांक 48/26, कलम 281, 125(A)(B) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र दुःख व संताप व्यक्त केला जात असून, शहरातील भरधाव वाहतूक व अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here