सावधान वणीकरांनो! खर्रा खाणे तात्काळ बंद करा !
वणी शहर व परिसरातील नागरिकांनी अत्यंत गंभीर बाबीची दखल घ्यावी- तुमच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे ! युवासेना
राजू तुरणकर – संपादक.
संपूर्ण महाराष्ट्र सह भारताच्या अनेक राज्यात सुगंधित गुटखा व तंबाखूवर शासनाने कडक बंदी घातलेली असताना, वणी शहरात मात्र राजरोसपणे सुगंधित तंबाखूची विक्री सुरू आहे. ही विक्री इतक्या बिनधास्तपणे सुरू आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून पोलीस स्टेशनपर्यंत सर्व यंत्रणा “श्रीमंती” करून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे.
🔴 याहूनही अधिक भयंकर वास्तव काय आहे?
वणी परिसरात सुगंधित तंबाखूची डुप्लिकेट (नकली) तयार करणारी फॅक्टरी कार्यरत असल्याची माहिती सर्वश्रुत आहे.
ही बाब केवळ बेकायदेशीर नाही, तर जनतेच्या जीवाशी खेळ करणारी आहे.
🔴 काय प्रकार सुरू आहे ?
ओरिजिनल ‘माझा’ तंबाखूचे डबे खालून छिद्र पाडून रिकामे केले जातात
त्या डब्यांमध्ये अत्यंत निकृष्ट, विषारी व डुप्लिकेट तंबाखू भरली जाते
आणि तीच तंबाखू अव्वाच्या सव्वा दराने वणी परिसरात विकली जाते
❗ या डुप्लिकेट सुगंधित तंबाखूमुळे कॅन्सरसारख्या गंभीर व जीवघेण्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो.
शासनाने तंबाखू बंदी घातली ती उगाच नाही — आरोग्य रक्षणासाठीच ही बंदी आहे.

वणीकरांनो, अजून किती गप्प बसणार?
तुम्हाला हळूहळू कॅन्सर खायला घातला जातोय!
संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित गुटखा–तंबाखूवर कडक बंदी असताना,
वणी शहरात मात्र पोलीस संरक्षणात खुलेआम विषाची विक्री सुरू आहे!
कायदा फक्त कागदावर, बंदी फक्त नावापुरती, आणि वणीमध्ये मात्र खर्रा माफियांचे राज्य! अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक सत्य!
वणी शहरातच सुगंधित तंबाखूची डुप्लिकेट फॅक्टरी सुरू असल्याची चर्चा नाही, तर उघड सत्य आहे! तुम्ही महागडा खर्रा घेताय…पण खिशातून पैसे जातात, आणि तोंडात विष टाकलं जातंय! ‘माझा’ तंबाखूचे डबे खालून फोडले जातात, त्यात घाणेरडी, निकृष्ट, विषारी डुप्लिकेट तंबाखू भरली जाते, आणि तीच तंबाखू सोन्याच्या भावाने तुमच्या गळ्यात मारली जाते!
हे फक्त फसवणूक नाही, हे फक्त बेकायदेशीर धंदा नाही
हे सरळ सरळ जनतेचा जीव घेण्याचा कट आहे!

❗ या डुप्लिकेट सुगंधित तंबाखूमुळे
➡️ हे जर थांबविल नाही तर फक्त पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबात कॅन्सर….
➡️ तोंडाचे, घशाचे, पोटाचे गंभीर आजार
➡️ अकाली मृत्यू
याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन मुंग गिळून गप्प! माफिया श्रीमंत,आणि सामान्य वणीकर आजारी! आता निर्णय घ्या!
आज खर्रा सोडला नाही , तर उद्या डॉक्टर आणि परवा स्मशान!
खर्रा खाणे तात्काळ बंद करा! आपल्या पोरांच्या हातात विष देऊ नका! माफियांच्या तोंडात पैसे घालणं थांबवा! वणीकर जर आजही गप्प बसले, तर उद्या या मृत्यूला आपणच जबाबदार असू!
🔥 हे आंदोलन आहे — इशारा नाही! 🔥 युवासेना….











