आलिशान कारमधून भोकं पाडलेली गुटख्याची शेकडो डबे जप्त !
पोलिसांच्या कारवाईने वणी व परिसरात नकली सुगंधित तंबाखू फॅक्टरी कार्यरत आहे याला मिळाले बळ .
राजू तुरणकर – संपादक.
वणी पोलिसांनी सुगंधित तंबाखूची शेकडो डबे जप्त करून केवळ देखावा केला की तस्करीच्या मुळावर घाव घालण्याची हिंमत दाखवणार, हा खरा प्रश्न आहे. भोकं पाडलेली डबे आणि आलिशान कार — हा प्रकार साधा नसून मागे मोठं रॅकेट असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
वणी पोलिसांची तपासाची दिशा नेमकी काय?
मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचणार की नेहमीप्रमाणे किरकोळ कारवाई करून गुटखा तस्करांना वाचवलं जाणार?
1 फेब्रुवारी 2026 रोजी गोकुळनगर भागात मजा तंबाखूचे रिकामे डबे विकत घेऊन जात असताना पोलीसांनी आर्टिगा कार पकडून ताब्यात घेतली आहे. या प्रकरणातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पान टपरी चालकांकडून वापरलेले डबे 100 रुपये प्रति डबा दराने खरेदी करुन त्यात नकली तंबाखू भरुन पुन्हा विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र 3 दिवसांनंतरही सदर प्रकरणी कोणतीही चौकशी किंवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
काय प्रकार सुरू आहे ?
ओरिजिनल ‘माझा’ तंबाखूचे डबे खालून छिद्र पाडून रिकामे केले जातात, त्या डब्यांमध्ये अत्यंत निकृष्ट, विषारी व डुप्लिकेट तंबाखू भरली जाते, आणि तीच तंबाखू अव्वाच्या सव्वा दराने वणी परिसरात विकली जाते. या डुप्लिकेट सुगंधित तंबाखूमुळे कॅन्सरसारख्या गंभीर व जीवघेण्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो.

दरम्यान, गुटखा तस्कर हे फार मोठे आर्थिक सूत्रधार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचे राजकीय लागेबांधे असून व ते डॉन असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत व तशी गावात चर्चा आहे,महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता देऊन संपूर्ण वणी उपविभागात अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय सुरु असल्याची खमंग चर्चा शहरात तंबाखू चोळून सूरू आहे.
या गंभीर प्रकरणात पोलिस प्रशासनान बुडाशी जावून बाजीराव दाखवून करवाई केली तर नकली सुगंधित तंबाखू फॅक्टरी आहे ? हे उघड होईल, जर कठोर कारवाई केली तर, तस्करीचे संपूर्ण जाळे उघड होईल व दोषींवर कठोर शिक्षा होऊ शकते, अशी करवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा शासनाच्या बंदी आदेशांची थट्टा होत असल्याची खात्री होईल. एकीकडे पोलीस प्रशासन शाळकरी मुलांना निर्भय, निर्व्यसनी जीवन जगण्याचे प्रबोधन करुन धडे देत आहेत, दुसरीकडे मात्र गुटखा तस्करांची पाठराखण ? त्यामुळे शहारत पोलीस प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवाई वर शहरातील विविध सामाजिक संघटना लक्ष ठेवून आहेत, तस्करांच्या मुसक्या पोलीस प्रशासन आवरण्यास असफल ठरले तर सामजिक संघटना उग्र आंदोलन करणार आहे.











