प्रगतीनगर वणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा.
कृतिशील उपक्रमातून महिलांचा होणार सन्मान. विवीध स्पर्धांचे आयोजन.
राजू तुरणकर वणी : आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्त प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका रिता महेश पहापळे यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर, पाण्याची टाकी, प्रगती नगर, वणी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी समूह नृत्य स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. समूह नृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ₹५०००, द्वितीय क्रमांकाला ₹४००० आणि तृतीय क्रमांकाला ₹३००० रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच नृत्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाला ₹७००, द्वितीय क्रमांकाला ₹५०० आणि तृतीय क्रमांकाला ₹३०० रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या महिला मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. रिता महेश पहापळे, महिला व बालकल्याण सभापती, नगर परिषद वणी यांनी केले आहे.












