युवा हुंकार संघटना शिवतीर्थ रायगड येथे स्थापना .

0
240

युवा हुंकार संघटना शिवतीर्थ रायगड येथे स्थापना .

पवित्र किल्ला रायगड येथे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा घेत संघटनेची घोषणा.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड किल्ला या पवित्र भूमीवर “युवा हुंकार संघटना” या अराजकीय संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे.

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत धर्म, समाज, स्वाभिमान आणि स्वच्छतेचा संदेश देत तरुणांना संघटित करून समाजकार्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प घेऊन अजिंक्य शेंडे यांनी या संघटनेची स्थापना केली आहे.

छत्रपतींच्या पराक्रमाची प्रेरणा आणि स्वराज्याच्या आदर्शांवर चालण्याची प्रतिज्ञा घेऊन ही संघटना युवकांचा बुलंद आवाज करीत वणी विधानसभा क्षेत्रातील सामान्य नागरिकांच्या प्रशासनात रखडलेल्या कामांना गती देणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध ठाम संघर्ष उभा करणे तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळी उभारून तळागाळातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा या संघटनेच्या स्थापने मागील मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही संघटना केवळ नावापुरती नाही, तर अन्यायाविरुद्ध थेट रणांगणात उतरणारी तरुणाईची ताकद ठरणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील सामान्य माणसांची प्रशासनात रखडलेली कामे मार्गी लावणे, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणे आणि सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळी उभ्या करून तळागाळातील लोकांच्या हक्कासाठी झुंज देणे – हा या संघटनेचा ठाम निर्धार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी सांगीतले आहे.

आता अन्याय सहन केला जाणार नाही…सामान्य माणसाच्या हक्कासाठी युवा हुंकार रणांगणात उतरणार !

“शिवविचार आमचा श्वास…समाजहित हाच आमचा ध्यास  हे तत्व घेवून आज शिवजयंती दिनी ही संघटना जनसेवेत जाहीर करत असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी सांगीतले यावेळी राजु तुरणकर, बंडु चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here