युवासेनेचे पोलीस प्रशासना विरुद्ध आक्रमक धरणे आंदोलन संपन्न.

0
530

युवासेनेचे पोलीस प्रशासना विरुद्ध आक्रमक धरणे आंदोलन. आमदार संजय देरकर यांचा आठ दिवसाचा अल्तीमेटम.

राजु तुरणकर – संपादक.

गुटखा तस्करीला उघडपणे अभय देणाऱ्या वणी पोलीस प्रशासनाच्या विरोधात युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे नेत्रुवात धरणे आंदोलन आज 26 जानेवारी रोजी संपन्न झाले.

महाराष्ट्रात कायद्याने बंदी असलेली सुगंधित तंबाखू व गुटखा वणी परिसरात खुलेआम विकले जात असताना, वणी पोलीस प्रशासन केवळ नाटक, दिखाऊ कारवाई आणि बनावट पंचनामे करून तस्करांना पाठीशी घालत असल्याच्या गंभीर आरोप युवासेने तर्फे करण्यात आला होता.
पंचशील नगर मधील एक महिन्यापूर्वी केलेली बनावट कारवाईतील मुख्य आरोपीला अटक करावी हे ह्या धरने आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. या आंदोलनाच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, राजू तुराणकर, आयुष ठाकरे, बंडू चांदेकर, दिलीप काकडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, पुरुषोत्तम बुटे, राष्ट्रवादीचे दिलीप भोयर, लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, नगर सेवक अजय धोबे, शत्रुघ्न मालेकर, अनिकेत बदखल, गुलाम रंगरेज, दत्ता बोबडे, समीर लेनगुरे, अभय चौधरी, मिलिंद बावणे, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, अजय चन्ने, सचिन पचारे, किशोर ठाकरे, संतोष कुचनकर, संदीप गोहकार, विजय अवताडे, अमृत फुलजले, श्री बदखल, आशिष रिंगोले, अमोल झोटिंग, मोरेश्वर उज्वलकर, चेतन उलमले, गुड्डू घाटोळे, राजू पाटील, मनीष बत्रा, विशाल देवतळे, शंकर देरकर, संस्कार हेपट, रवी कांबळे, अक्षय लाडे, रोशन जाधव, गुड्डू धोटे, मोहम्मद अन्सार, योगेश उपरे, गणेश काळे, नारायण गोडे, अभिजीत चालकुळे तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित राहून पोलीस प्रशासना विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला.

आमदार संजय देरकर यांचा पोलीस अधिकाऱ्यांना आठ दिवसांचा अल्टीमेटम. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलन स्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार वणी पोलीस  यांच्या सोबत चर्चे दरम्यान आमदार संजय देरकर यांनी पोलीस प्रशासनाला आठ दिवसांत सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याची ताकीद देत गुटखा तस्करांना अटक करण्याचे आदेश दिले, आठ दिवसांत तसे न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट मत व्यक्त करित अजिंक्य शेंडे यांना आजचे धरणे आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांच्या तोंडी आश्वासनानंतर थांबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here