“34 वर्षांनी पुन्हा वाजली शाळेची घंटा…” आठवणींनी डोळे पाणावले.
विवेकानंद विद्यालयाच्या 1992 बॅचचे स्नेहमिलन
राजू तुरणकर – संपादक.
काळ पुढे सरकतो… आयुष्य वेगवेगळ्या वाटांनी आपल्याला दूर नेतं… पण काही नाती अशी असतात, जी वर्षानुवर्षांनीही तशीच जिवंत राहतात. विवेकानंद विद्यालयाच्या 1991-92 च्या विद्यार्थ्यांनी तब्बल 34 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत त्या मैत्रीच्या नात्याला उजाळा दिला… आणि शाळेच्या आठवणींनी अनेकांचे डोळे नकळत पाणावले.
रविवारी शाळेच्या आवारात पुन्हा एकदा तीच घंटा, तीच प्रार्थना आणि तेच जुनं वातावरण अनुभवायला मिळालं. वर्गात बसलेले तेच मित्र… चेहऱ्यावर काळाच्या खुणा असल्या तरी मन मात्र अजूनही त्या शाळकरी दिवसांतच रमलेलं होतं.
कोणी आयुष्यात खूप पुढे गेले, कोणी दूरवर स्थायिक झाले… पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा “वर्गमित्र” झाले. हसणं, गप्पा, जुन्या आठवणी, शिक्षकांच्या आठवणी… प्रत्येक क्षण भावनांनी ओथंबून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण गंगशेट्टीवार होते. यावेळी हरीभाऊ चिखले, वामन मिलमिले, अनंत एकरे, गणपतराव पारखी, तिलोत्तमा भेदोडकर, स्नेहलता चुंबळे, भास्कर काळे, प्रदीप सुंकुरवार, लोणारे सर, राठोड सर, नवनाथ नगराळे, रामकृष्ण बोबडे, दिलीपराव आस्कर आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. संतोष बेलेकर, मंगेश करंडे, वैभव आत्राम, योगेश खिवंसरा, अमित कळमकर, राहुल रेगुंडवार, विनोद कापसे, सारंग काळे, अविनाश दोडके, अमर देवाळकर, सचिन मत्ते, ताराचंद घारापुरे, जितेश खाडे, विजय गाडगे, ईश्वर मालेकर, अनिल मस्के, संतोष सूर, सरिता दुबे, योगेश खारकर, राजू काळे, राजेश मांडवकर, उमाकांत बदखल, प्रमोद झिले, विकास वैद्य आदींनी या सत्कारात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन मंगला गोहणे-भोयर व सुनील ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक सुलक्षणा भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश करंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कविता मानकर, अंजू येवले, शारदा ढेंगळे, कविता दिकुंडवार, किरण चिंडालिया, प्रकाश काशीकर, अनघा कोंडावर, दुर्गा वाटमोडे, भारती शर्मा, राधा थेरे यांच्यासह सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी दिवंगत शिक्षक व वर्ग मित्रांना मौन श्रद्धांजली वाहताना वातावरण काही क्षण स्तब्ध झाले… आणि अनेकांच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला.











