लोकप्रिय लावणी नृत्यांगना गौतमी पाटील वणीत.

0
493

वणीत २९ डिसेंबरपासून टी-१० चॅम्पियन लीग- क्रिकेटप्रेमींना खुशखबर, तर संपूर्ण महााष्ट्रातील लोकप्रिय लावणी कलाकार गौतमी पाटील करणार सामन्यांचे उद्घाटन.

यवतमाळ जिल्ह्यात गौतमी पाटील पहिल्यांदा वणीत, तरुणाई थिरकणार, अनेक वर्षानंतर वणी करांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी.

राजू तुराणकर – संपादक लोकवाणी जागर

वणी शहरात टी १० चॅम्पियन्स लीग २०२४ ची सर्व तयारी पूर्ण झाली असून, २९ डिसेंबरला रात्री ७ वाजता शासकीय मैदानात या क्रिकेट स्पर्धेचा उ‌द्घाटना चा दिमाखदार सोहळा  पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या चमूंना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून वणी क्रिडा क्षेत्रात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या स्पर्धा होत असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी दिली.

२ जानेवारीपासून लीगला सुरुवात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन चॅम्पियन लीग कार्यकारिणीचे अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे. यात १० टीम सहभागी होणार आहेत.

या टीममध्ये वणी विधानसभा क्रिकेट क्षेत्रातील धडाकेबाज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. संपूर्ण सामने हे दिवस व रात्रकालीन राहणार आहेत. एका दिवशी पाच सामने खेळले जाणार आहेत म्हणजे म्हणजे महिला प्रेक्षकांसाठी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी कातील अदाकारा लोकप्रिय लावणी नृत्यांगना गौतमी पाटील.

उ‌द्घाटन सोहळ्यासाठी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच त्यांचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया, उपाध्यक्ष मनीष गायकवाड, सचिव उमेश पोद्दार, सहसचिव संदीप बेसरकर, प्रचारक पीयूष चव्हाण, सह प्रचारक राजू रिंगोले यांच्यासह सदस्य मयूर घाटोळे, शुभम मदान, कीट मॅनेजर तौसीफ खान, क्युरेटर नंदकिशोर रासेकर, सल्लागार संघदीप भगत यांनी केले आहे.

लावणी कलाकार गौतमी पाटील  अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे. कधी वादांमुळे तर कधी तिच्या अदांमुळे सोशल मीडियावर  ती नेहमीच चर्चेत असते. सबसे कातिल गौतमी पाटील हे वाक्य तर आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील पोरा- टोरांनाही पाठ झालं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की तुफान गर्दी झालीच पाहिजे. लोकं अगदी घराच्या शेडवर, झाडाच्या फांद्यांवरुन चढून कार्यक्रमाला गर्दी करताना दिसताय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला फार मोठ्या स्वरूपात मागणी आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेली ही लावणी कलाकार महाराष्ट्राचे पुणे असलेल्या सांस्कृतिक नगरी वणीच्या शासकीय मैदानावर येणार असल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here