जड वाहतुकीस बंदी असताना, रस्त्यावरून चालणाऱ्या जड वाहतुकीस नागरिकांनी वाहने अडवून दिला सज्जड दम.

0
287

कुंभा ते खैरी मार्गांवरील जड वाहने कार्यकर्त्यांनी रोखली व परतून लावली.

परत या रस्त्यावरून जड वाहने आली तर हवा सोडण्यासह दिला सज्जड दम…

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

मारेगाव : कुंभा ते खैरी रोड वर जड वाहणास परवानगीही नसतांना या मार्गांवर जड वाहणांची वाहतूक होत असल्याने स्थानिकांनी आपला रोष व्यक्त करित या रस्त्यावरील होणारी वाहतूक परतून लावली.

तालुक्यातील कुंभा ते खैरी रस्त्याने भरधाव तथा ओव्हर लोड,जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून याचा नाहक त्रास या मार्गांवरील ग्रामवासियांसह प्रवाशांना सहन करावे लागतो. सदर रस्ता हा जड वाहतुकी करिता नसल्याची या परिसरातील नागरिकांची ओरड आहे.

दरम्यान या रोडवर जड वाहने दिवसरात्र भरधाव धावत असल्याने या रस्त्याची अवस्था बिकट किंबहुना अपघाताची शक्यता मोठी बळावली असल्यामुळे कुंभ येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, निलेशभाऊ परसराम, विजयभाऊ ठाकरे, सुमितभाऊ कोकडे, प्रवीणभाऊ महाजन ह्यांच्या उपस्थितीत व आपल्या सहकार्यासह या रस्त्यावर धावणाऱ्या जड वाहनाना थांबवून परतून लावले.

मागील आठ दिवसापासून आणि आज सुद्धा या रस्त्यावर ते पाळत ठेवत येणारे जड वाहने परत पाठवली असे विजयभाऊ बोथले . यांनी सांगितले. दरम्यान, पुन्हा जड वाहने दिसली तर टायर ची हवा सोडू, नाहीतर दणके देवू असा सज्जड दम वाहनचालकांना दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here