मारेगाव अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई. महसूल विभाग सातत्याने ॲक्शन मोडवर.
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
मारेगाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वाहनावर आज शुक्रवारी (दि.29) महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली. यावेळी रॉयल्टी न आढळल्याने महसूल पथकाने ट्रकसह रेती जप्त करून ट्रक तहसील परिसरात लावला.
अवैध रेती वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी हे पथक मार्डी परिसरात ग्रस्त घालत होते. यावेळी मालवाहतुक करणारा ट्रक क्र. (एम एच 27 बी एक्स 4559) तपासला असता रेती वाहतूक होत असल्याचे मार्डी ते मजरा रस्त्यावर आढळून आले. यावेळी वाहन चालक याच्याकडे कागदपत्र्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, तो काहीच बोलायला तयार नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज सकाळी दोन तास चाललेल्या कारवाई दरम्यान,कागदपत्र्यात तफावत आढळल्याने पथकाने रेतीसह ट्रक ताब्यात घेऊन जप्ती ची कारवाई केली व रेती सह ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. ही कारवाई मंडळ अधिकारी अमोल गुघाने मारेगाव, तलाठी कुळमेथे, तलाठी मडावी, तलाठी सोयाम, कोतवाल भोंगळे, कोयचाडे, येवले यांनी केली.