वृद्धांना आधार देण्यासठी वणीत माऊली वृद्धाश्रम समाजाच्या सेवेत…
दीनानाथ आत्राम यांचे हस्ते शुभारंभ….
राजु तुरणकर – संपादक.
दि. 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा येथे संजीवनी दारुमुक्ती केंद्रा च्या बाजूला माऊली वृद्धाश्रमाचा उद्भघाटन सोहळा संपन्न झाला.
भगवान पाचभाई व त्यांचे सहकारी यांच्या संकल्पनेतून आजच्या धावपळीच्या जीवनात वृद्धांच्या भावनेची काळजी घेण्यासाठी वृद्धाना आपले मत व्यक्त करण्यासाठी एखाद हक्काच ठिकाण असाव, जेणेकरून मानसिक स्वास्थ जोपसण्यासाठी मदत होईल हा दूर दृष्टीकोण लक्षात घेऊन सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्थेने समाजाच्या सेवेत हा उपक्रम सूरू केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीनानाथ नागोजी आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. भंडारी , उपाध्ये सर, यशवंत बोन्डे, रहीम शेख व निमंत्रीत मान्यवर होते तसेच संजीवनी दारुमुक्ती केंद्रातील सहकारी यांनी या उक्रमाअंतर्गत मोलाची मदत केली.