आपला कामाचा माणूस’ कॅलेंडरचे अनावरण…..

0
386

आपला कामाचा माणूस’ कॅलेंडरचे अनावरण…..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नागपुरात ऐतिहासिक क्षण. आमदार संजयभाऊ देरकर यांचे मार्गद्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वगुणांची दखल.

शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या कामाची निष्ठा, तळागाळातील संपर्क आणि जनतेसाठी अखंड झटणारी वृत्ती यांना सलाम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आपला कामाचा माणूस’ या विशेष कॅलेंडरचे अनावरण नागपूरमध्ये भव्यदिव्य वातावरणात पार पडले. हे अनावरण खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमदार संजयभाऊ देरकर यांचे मार्गदर्शनाखाली झाले, ज्यामुळे कॅलेंडरला एक वेगळं महत्त्व आणि वजन प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या वेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर, कट्टर शिवसैनिक, विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी, उत्साहाने आणि शिवसेना बांधवांच्या जय घोषांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. या अनावरण सोहळ्यात यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या कामाची विशेष दखल घेण्यात आली.पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीतून त्यांनी दाखवलेल्या चोख कामगिरीसाठी आणि जनतेशी असलेल्या अप्रतिम संवादासाठी त्यांना ‘आपला कामाचा माणूस’ असे संबोधून सन्मानित करण्यात आले. याच भावनेतून या कॅलेंडरला हे शीर्षक देण्यात आले असून, जिल्हाध्यक्ष निखाडे यांच्या नेतृत्वगुणांची दखल संपूर्ण पक्षाने घेतल्याचे या अनावरणातून स्पष्ट झाले. कॅलेंडरचे प्रत्येक पान हे शिवसेनेच्या तळागाळापर्यंत पोहचलेल्या कामांचे, संघर्षांचे आणि जनतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे प्रतीक ठरणार आहे. ऊद्धव ठाकरे यांनी अनावरणानंतर बोलताना पक्षातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर प्रकाश टाकत सांगितले की, “शिवसेना ही काम करणाऱ्या माणसांची सेना आहे. जनतेसाठी झटणारे प्रत्येक शिवसैनिक हा आमचा खरा अभिमान आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here