शासकीय क्रीडांगणावर कर्तव्यतत्पर क्रीडा अधिकारी स्व. चंद्रदीप शिंदे यांना श्रद्धांजली

0
177

शासकीय क्रीडांगणावर कर्तव्यतत्पर क्रीडा अधिकारी स्व. चंद्रदीप शिंदे यांना श्रद्धांजली.

वणी येथील क्रिडा क्षेत्रात भरीव योगदान, स्वर्गीय चंद्रदीप शिंदे यांच्या कार्याची उजळणी.

राजू तुरणकर – संपादक.

शासकीय क्रीडांगणावर माजी जिल्हा क्रीडा अधिकारी स्व. चंद्रदीप शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवाकाळात वणी येथील क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले. क्रीडाविकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांनी वणीतील युवकवर्गाच्या मनावर विशेष छाप उमटवली होती. युवकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यास उपस्थित मान्यवर व क्रीडाप्रेमींनी श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश पहापळे होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत मुरलीधर भोयर, गणेश आसुटाकर, मंगेश करंडे, अनिरुद्ध पाथरटकर, सतीश तेडेवार, नितीन मिलमिले, योगेंद्र शेंडे, सचिन टेकाम, रुपेश पिंपळकर, आझाद सिद्दीकी, सौरभ धोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जगदीश ठावरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश तेडेवार यांनी केले.
या प्रसंगी युवा नवरंग क्रीडा मंडळ, संस्कार क्रीडा मंडळ, इलेव्हन क्रिकेट क्लब, युवा फुटबॉल क्लब तसेच समस्त क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here