न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनच्या कार्यकारिणीची फेरनिवड.

0
171

न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनच्या कार्यकारिणीची फेरनिवड.

अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल तर सचिवपदी परशुराम पोटे….

वणी : न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक साप्ताहिक मुक्त ललकार कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत विद्यमान कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संघटनेने पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडत संघटनात्मक बळकटीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी सर्वानुमते विद्यमान कार्यकारिणीची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदी दिपक छाजेड, उपाध्यक्षपदी शेख इक्बाल तर सचिवपदी परशुराम पोटे यांची फेरनिवड जाहीर करण्यात आली.

बैठकीस माजी अध्यक्ष आसिफ शेख, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, प्रविण शर्मा, दिपक छाजेड, परशुराम पोटे, इक्बाल शेख यांच्यासह असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीने पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक सक्षमपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित सदस्यांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here