रायगड किल्ला येथे श्री संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान.

0
589

रायगड किल्ला येथे श्री संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान.

रायगडाच्या पायथ्याशी आज एक प्रेरणादायी दृश्य पाहायला मिळाले.

राजू तुरणकर – संपादक.

वणी येथील शिवसैनिकांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान राबवत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त दोन महापुरुषांना मानवंदना अर्पण केली.

स्वराज्याच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत, “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर ठेवण्यात आला.

शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य आणि शिस्तीचा आदर्श…तर संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश…या दोन्ही विचारांचा संगम आज रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला.

या स्वच्छ्ता अभियान अंतर्गत अजिंक्य शेंडे, राजु तुरणकर,  बंडु चांदेकर, नंदू ढूमने , दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे,मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले,मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय,श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया,सुयेश नगराळे ,संजोग झाडे, तुषार दुरुटकर या वणीतील शिवसैनिकांनी केवळ जयंती साजरी केली नाही, तर कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना मानवंदना दिली.

“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत” हा संदेश देत जीवन कसे जगावे याचा आदर्श घालून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here