दुभाजकला दुचाकीची धडक एक इसम गंभीर जखमी.
करणवाडी रेस्ट पॉइंट जवळ भीषण अपघात.
आनंद नक्षणे_ मारेगाव
वणी यवतमाळ राज्य महामार्गावर असलेल्या करणवाडी जवळील दुभाजकाला दुचाकीची धडक लागून एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
मारेगाव वरून गावाकडे परत जात असताना करणवाडी जवळ विलास विठ्ठल बुरान घोडदरा हे आपले दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळून गंभीर जखमी झाले. अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले .