शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सोडले रस्त्याचे उपोषण..

0
888

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनि पालकमंत्री नामदार संजयजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली उपोषणाची सांगता.

मेंढोली येथिल रस्त्यासाठी काळे यांनी केलेले जंगल सत्याग्रह उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी सुटले.

राजु तुरणकर – संपादक.

मेंढोली ते पिंपरी रस्त्याच्या कामासाठी सूरू केलेले हे उपोषण जनहितासाठीचे अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी पाऊल ठरले. या आंदोलनाची दखल घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला व चर्चेतून मार्ग काढीत पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात उपोषण सोडविण्यात यश मिळविले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश भाऊ वैरागडे, दीपकभाऊ कोकास, किरणताई नांदेकर, आशिष खुलसंगे, प्रसाद ठाकरे तालुका प्रमुख, राजू तुरणकर माजी नगर सेवक, अजिंक्य शेंडे माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख, युवराज ठाकरे युवासेना विधानसभा प्रमुख, शिवराज पेचे वणी शहर प्रमुख, अनिल उलमाले, सचिन पोहेकर, धीरज राजूरकर, विजय गेडाम, दादाजी बेलेकर, प्रकाश कऱ्हाड उपस्थित होते.

संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या उपोषणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका तात्याजी पावडे यांनी मांडली. तसेच मेंढोली ते पिंपरी रस्त्याचे काम तात्काळ मंजूर करून नागरिकांची रास्त मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

गावचे नेते विनायक ढवस व मोरेश्वर पोतराजे हेही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे यांनी शिवसेना पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यावर शिवसेना नेते पराग पिंगळे यांनी “तुमची मागणी लवकरच मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाईल. माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री यवतमाळ नामदार संजय राठोड यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी उमेश वैरागडे व आशीष खुलसंगे यांनी रस्त्याच्या कामाची हमी घेत, भविष्यातील गावातील ईतर कामे सुद्धा करण्याचे आश्वासन दिले व पदाधिकाऱ्यांना शब्दाला मान देवून उपोषण सोडल्या बद्दल मनोज काळे व गावकऱ्यांचे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बोरघाटे यांनी सदर कामाचे इस्टिमेट उपोषणस्थळी उपस्थित जनतेसमोर सादर केले.

जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या या आंदोलनाला यश मिळाले असून, भविष्यातही अशा जनहिताच्या प्रश्नांवर शिंदे सेनेच्या पदाधिकारी काम करतील असा विश्र्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here