शिंदोला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा राजकीय स्फोट!
२० वर्षांचे कट्टर विरोधक एकत्र… परिवर्तन पॅनलचे थेट आवाहन.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
शिंदोला : तब्बल वीस वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राजकीय प्रतिस्पर्धी आता अचानक एकाच व्यासपीठावर दिसू लागले आहेत. त्यामुळे गावातील वडिलधारी मंडळी, तरुण, माया, बहिणी तोंडावर बोट ठेवून राजकीय तमाशा पाहत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ही अनपेक्षित आघाडी झाल्याने गावाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पण गावात एकच चर्चा —ही आघाडी विकासासाठी की आपले धंदे चालु ठेवण्यासाठी ?
जनतेला एकीचा दिखावा केवळ भीतीपोटी.. कुणाची भिती, आपले धंदे लोकांना माहीत झाले, प्रचंड माया जमविली, आता जनता माफ करणार नाही म्हणुन हा एकीचा दिखावा, पण जनता मात्र आता धक्का देण्याच्या मानसिकतेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावात उदयास येत असलेल्या नव्या, आक्रमक आणि जनतेत वाढता प्रभाव असलेल्या युवा चेहऱ्यांमुळे जुन्या गटांची झोप उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच आपले जुने वाद, भांडणं आणि आरोप-प्रत्यारोप विसरून हे सर्वजण एकत्र आले, अशी चर्चा जोर धरत आहे.
आता सरळ लढत —एकीकडे जुनी आघाडी, तर दुसरीकडे जनतेच्या मनातील परिवर्तन पॅनल!
या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांची साखळी तयार करून किल्ला लढवण्याची तयारी दाखवली असून, ते थेट या “जुनी आघाडी”ला भिडणार आहेत. गावातील तरुणांमध्ये त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. एक गुप्त सर्व्हे नुसार जनता प्रचंड नाराज असून ते धक्का देण्याच्या मानसिकतेत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे.
जनतेचा सवाल —२० वर्षे भांडणारे आज अचानक एकत्र कसे? सत्ता टिकवण्यासाठी ही शेवटची धडपड तर नाही?की खरोखरच गावाच्या विकासासाठी एकत्र आले?
शिंदोल्यात आता खरी लढाई —“जुनी राजकारण विरुद्ध नवं नेतृत्व!”मतदार आता गोंधळात नाही…यावेळी ते ठरवणार —जुन्या समीकरणांना साथ द्यायची की नव्या नेतृत्वाला संधी द्यायची!











