आचर्यचकित वणीकर ! WPL मंचावर मुख्याधिकारी; नगर पालिकेच्या कार्यक्रमांना दांडी ?
“नमो उधाण” भूमिपूजनाच्या तीनही कार्यक्रमाला अनुपस्थिती.
राजु तुरणकर – संपादक.
वणी शहरात सध्या संतापाची लाट उसळली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असताना, WANI Premier League (WPL) च्या मंचावर मात्र ठळक उपस्थिती लावताना दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला गैरहजर राहिलेले मुख्याधिकारी, ‘नमो उद्यान’च्या एक-दोन नव्हे तर तीन वेळच्या भूमिपूजन कार्यक्रमांनाही दांडी मारताना दिसले. मात्र, राजकीय वाद शिगेला असताना WPL च्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते.
प्रशासनावर गंभीर आरोप.
वणी नगरपरिषदेच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्हांची मालिका उभी राहिली आहे. नळाद्वारे अशुद्ध पाणीपुरवठा — तरीही कोणतीही ठोस कारवाई नाही. माहिती अधिकारात “माहिती उपलब्ध नाही” अशी उत्तरं. झाडे न लावता ठेकेदारांना बिल अदा केल्याचा आरोप.तक्रारी असूनही त्रयस्थ व्यक्ती कडून चौकशी अथवा प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता देयके मंजूर.गणेश गृहनिर्माण सोसायटी अतिक्रमण प्रकरणात ढिलाई.महिलांना कामात न घेण्याचे कथित तोंडी आदेश. प्रशासन की राजकारण?
शहरातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थिती आणि राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर निवडक कार्यक्रमांना उपस्थिती—यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण आणि नमो उद्यान भूमिपूजनावरून पेटलेल्या वादात प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने तणाव अधिकच वाढल्याची चर्चा आहे.
💧 “अमृत जल” योजना—फक्त कागदावर?
अमृत जल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाइपलाइन कामांबाबत आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या तक्रारींबाबत मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याचे उदाहरण नागरिकांना दिसत नाही.
वणीकरांचा संतप्त सवाल.
“जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून, नगर पालिकेच्या पारदर्शक कारभारावर नियंत्रण न ठेवता, नगर पालिकेच्या कार्यक्रमात हजेरी न लावता, नगर पालिकेचा सबंध नसलेल्या कार्यक्रमात हजेरी लावणे—हेच का प्रशासन?” शहराच्या समस्या सोडवणे महत्त्वाचे की राजकीय श्रेयवादात सहभागी होणे?
मुख्याधिकारी यांचा “WPL खेळ” नेमका कोणासाठी संदेश देणारा —जनतेसाठी की राजकारणासाठी…












